राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परिवर्तन सभा

दहिसर - दहिसर पूर्वच्या रावळपाडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन अमरनाथ झा यांनी केलं. या कार्यक्रमाला एनसीपीचे नेते सचिन अहिर उपस्थित होते. येत्या निवडणुकीसाठी परिवर्तन आणण्यासाठी आणि भ्रष्ट नेत्यांचं सर्व काळंबेर बाहेर काढण्यासाठी एनसीपी कटीबद्ध असल्याचं या वेळी सचिन अहिर यांनी सांगितलं. त्यामुळे रविवारी एनसीपीकडून सुरुवात करण्यात आलीय. या कार्यक्रमाला मनीष दुबे, अॅड. इंद्रपाल सिंह, संध्या मोरे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या