राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि घाटकोपरमधील प्रभाग १२४च्या नगरसेविका ज्योती खान यांचे पती हारून खान यांनी भाजपात प्रवेश केला आहे. हारून खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
हारून खान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घटकोपर आणि विक्रोळीतील नेते आहेत. घटकोपरमधील भाजपाचे प्रवीण छेडा आणि मंगल भानुशाली यांनी भाजपा सोडल्यांनंतर हारून खान यांना भाजपाने आपल्याकडे वळवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हारून खान यांनी मुलगा रोशन खानसह भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार किरीट सोमय्या आणि महापालिका गटनेते मनोज कोटक उपस्थित होते. हारून खान हे १९९५ ला भाजपाकडेच होते. त्यामुळे ते स्वगृही परतले असे भाजपाचे मनोज कोटक यांनी सांगितले.