मुंबई विद्यापीठाचं डम्पिंग ग्राउंड झालंय- आव्हाड

मुंबई विदयापीठाचं अक्षरश: डपिंग ग्राऊंड झालं आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज असल्याचं मत जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत व्यक्त केलं.

शाळांचं खासगीकरण

महाराष्ट्रात पटसंख्येचा दाखला देत १३०० शाळा बंद केल्या जात आहे. शोषित, गरीब समाजाला वंचित ठेवलं जात आहे. बंद करत असलेल्या शाळांच्या ठिकाणातील मुलांची दूरवर जाण्याची सोय सरकारने केली आहे का? सरकार शाळांचं खाजगीकरण सुरू करत आहे. सरकार गरीब आणि श्रीमंतांमध्ये शिक्षणातून विषमतेची दरी निर्माण करत आहे. समाजातल्या एक घटक वंचित रहावा, असा सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आ. आव्हाड यांनी सरकारवर केला.

मराठी शाळा होताहेत बंद

मुंबई महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांच्या हक्काच्या शाळांना टाळं लावून अंबानी, अदानी यांना त्यांच्या खाजगी शाळांना जागा खाली करुन दिल्या जात आहेत. मराठी राज्यात मराठी मुलांना शिक्षण मिळू नये हे दुर्देव आहे. ज्या शिवसेनेला मराठी माणसाने २५ वर्षे महापालिकेमध्ये सत्ता दिली त्या मराठी माणसाच्या मराठी मुलांना बाहेर काढण्याचं काम सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या