शरद पवारांच्यानंतर राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचा राजिनामा

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहे. राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नेत्यांना शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहेत.

जितेंद्र आव्हाडांसह ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. 

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. 

पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा. लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा, आम्हीही आग्रही आणि ठाम आहोत. ठाण्यातील सर्व राजीनामे पाठवत आहेत, मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. लोकशाहीचा आदर करत त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.

पवारांच्या छत्र छायेखाली मी ४० वर्ष आहे. म्हणून मला कोणी शिकवू नये. मी माझा मुद्दा मांडला आहे, मी थांबणार नाही. आजच्या परिस्थितीत शरद पवार राजकारणातील केंद्रबिंदू आहेत. शेवटी शरद पवार जे म्हणतील ते आमच्यासाठी अंतिम असेल. तरी असा निर्णय आम्हाला मान्य नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या