'भाजपाच्या जाहिरात खर्चाविरोधात तक्रार करणार'

नरिमन पॉईंट - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांना जाहिराती देण्यात आल्या. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र भाजपाने कोणत्याही जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख न करुन कायद्याचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून खर्चाची मर्यादा एका पक्षाला मुंबईतील 227 उमेदवारांसाठी 22 कोटी 70 लाखांची मर्यादा ठरवून दिली असताना भाजपाने तब्बल 500 कोटी रुपयांचा खर्च केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास भीती वाटत असेल तर त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पाठिंबा काढून घ्यावा, शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना किंवा भाजपा या कोणत्याही पक्षाला आपला पाठिंबा देणार नसल्याचही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या