राज्यात २६ जिल्ह्यांत ताडीविक्री होणार बंद

मुंबई - ताडी विक्रीबाबत राज्य सरकारनं नवीन धोरण घोषित केलंय. ज्या जिल्ह्यात ताडीचं झाड आहे त्याच जिल्ह्याला ताडी विकण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे राज्याचे उत्पादनशुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्षष्ट केलंय. तसेच 1000 झाडांमागे एका ताडीच्या दुकानाला परवानगी देण्यात येणार आहे. विशेष राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये ताडीची झाडे नाहीत त्यामुळे त्या जिल्ह्यांना ताडी विक्रीची परवानगी मिळणार नसल्याचंही त्यांनी या वेळी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या