मनसे मेळावा होणार नाही - राज ठाकरे

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा होणार नाही, स्थानिक पातळीवर गुढीपाडवा साजरा करा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंज येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. तर, अपयशामुळे मेळावा रद्द करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतल्याचं बोललं जात आहे.

गुढीपाढवा मेळावा यंदा होणार नसला तरीही प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या विभागात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना एकत्र जमवून कार्यक्रम करावेत असे आदेशही ठाकरे यांनी सोमवारी विभागप्रमुख आणि मनसे कार्यकर्त्यांना दिले आहे.

गतवेळच्या गुढीपाडवा मेळ्याव्यात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे तसेच कोर्टाच्या आदेशांची पायमल्ली केल्याप्रकरणी मनसेला अवमान नोटीस देखील बजावण्यात आलेली होती. मनसेने जाणीवपूर्वक आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे कोर्टाने संताप व्यक्त केला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या