दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत मंगळवारी मतदान पार पडलं. मतदानाला राजकारण्यांसह व्हिआयपी मुंबईकरांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, किरीट सोमय्या, मनोहर जोशी यांच्याह अनेक सिनेकलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला. तसेच निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया आणि पालिका आयुक्त अजॉय मेहता, टीना अंबांनी यांच्यासह अनेक मान्यवरांनी देखील मतदान केलं. 2012 च्या तुलनेत यंदा मुंबईकरांनी रेकॉर्ड ब्रेक असं मतदान केल्याचे पहायला मिळालं. त्यामुळे आता महापालिकेत कुणाची सत्ता येणार हे पहावं लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या