मुंबईकर प्रवाशांच्या पदरी निराशा

मुबंई - पहिल्यांदाच सर्वसाधारण बजेटसोबतच रेल्वे बजेट सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 चं रेल्वे बजेट सादर केलं.

  • रेल्वेसाठी 1 लाख 31 हजार कोटींचं बजेट, 55 हजार कोटी सरकार देणार
  • 500 रेल्वे स्थानकांवर लिफ्ट आणि सरकते जिने
  • सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट
  • ई तिकीट खरेदी केल्यास सेवा कर लागणार नाही
  • 1 लाख कोटींचा राष्ट्रीय रेल सुरक्षा फंड
  • 3 हजार 500 किमी नवे रेल्वे रुळ, 7 हजार रेल्वे स्टेशनवर सौरऊर्जा प्रकल्प
  • पर्यटन आणि तीर्थ क्षेत्रांसाठी विशेष ट्रेन सुरू करणार
  • सुरक्षा दलातल्या जवानांना त्यांची तिकीटं बुक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

या घोषणा जरी अर्थसंकल्पात करण्यात आल्या असल्या तरी मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशाच पडलीय. आवश्यक सोईसुविधा, रेल्वे गाड्या यासंदर्भात कुठलीच घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात हाती काहीच लागले नाही अशी मुंबईकरांची प्रतिक्रीया आहे. रेल्वेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी चर्चा होती. मात्र अरुण जेटलींनी प्रवासी भाडेवाढीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना तेवढा तरी दिलासा मिळाला आहे.

रेल्वे बजेटवर मुंबईकरांचं काय म्हणणं आहे?

पुढील बातमी
इतर बातम्या