कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक

मुंबई -   विधानपरिषदेत बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी शिवसेनेचे एकही सदस्य हजार नव्हते, त्यामुळे सरकार बहुमतात आहे हे अद्याप सिद्ध झालं नसल्याचं विधान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. त्यामुळे राज्यपालांचं अभिभाषण पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्याच सुरात सूर काँग्रेसच्या नारायण राणे यांनी देखील मिसळला. दरम्यान आजही विधान परिषदेमध्ये शेतकरी कर्जमाफिवरून विरोधक आक्रमक झाले आहेत आणि शिवसेना नेत्यांनीही याला साथ देत वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. 9 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतरही राज्य सरकार का वाट बघतं असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेना सत्तेत राहून शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही, म्हणून शिवसेनेचे आमदार आंदोलन करत असल्याचा टोलाही विरोधकांनी लगावला.

पुढील बातमी
इतर बातम्या