भाजपाची ओवेसींच्या विरोधात तक्रार

मुंबई - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याविरोधात मुंबई भाजपाने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आवेसी यांचे वक्तव्य सामाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. जातीय सलोखा बिघडवणारे आहे. त्यासोबतच जाती-धर्म आणि भाषेच्या नावावर मते मागता येणार नाहीत या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरूद्ध असल्याचे सांगत हे वक्तव्य मुस्लिम समाजाचे नुकसान करणारे असल्याचे सांगत याची चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली. मुंबईमध्ये 21 टक्के मुस्लिम आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचे बजेट हे 37 हजार कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे जर एमआयएमला मतं दिली, तर मुस्लिम वॉर्डात 7 हजार 770 कोटी रुपये खर्च करेन, असा दावा एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी केला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या