काँग्रेसच्या प्रचारासाठी पी चिदंबरम मुंबईत

मुंबई - महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते पी चिदंबरम मुंबईत दाखल झाले आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता अंधेरीमध्ये पी चिदंबरम यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धारावीत मोठ्या संख्येने तमिळ समुदाय आहे. त्यामुळे पी चिदंबरम यांनी माजी खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत सभा घेतली. या सभेत पी चिदंबरम यांनी खास तमिळ शैलीमध्ये भाषण करून मुंबईच्या विकासासाठी काँग्रेसला मतदान करून साथ द्यावी असे आवाहन केले. काँग्रेसमुळेच मुंबईचा विकास होणे शक्य आहे, असेही आपल्या तमिळ भाषेतून आवाहन केले. यानंतर वांद्रे पश्चिममध्ये युवकांशी तसेच विद्यार्थांशी त्यांनी राजकारण, अर्थकारण, नोटाबंदी याविषयावर संवाद साधला.

पुढील बातमी
इतर बातम्या