पवारांचा 'पॉवर' प्ले?

मुंबई - महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण ढवळून टाकण्याची क्षमता वारंवार सिद्ध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राज्यात नवा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. किंबहुना तसे संकेत देऊन राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. येत्या 3 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं फर्मान शरद पवार यांनी काढलं आहे. 

6 मार्चपासून सुरु होणारं महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्यानंतर दोनच दिवसानंतर होणारी मुंबई महापौरपदाची निवड या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुंबईत बोलावलेली बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य आणि मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक भाजपापेक्षा शिवसेनेला झुकतं माप देतील, अशा आशयाचं पवारांचं विधान आणि ‘बोलतात त्याच्या नेमकं विरोधात वागतात’, हा पवारांचा पूर्वलौकिक लक्षात घेता ऐन मार्च महिन्यात राजकीय तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या