शरद पवार यांचा एमसीएचा राजीनामा

मुंबई - लोढा समितीच्या शिफारशींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांनी हा राजीनामा एमसीएच्या व्यवस्थापकीय मंडळाकडे सुपूर्द केला. या राजीनाम्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटबंदीच्या निर्णयावरून जोरदार टीका केली.

क्रिकेट संघटनेमध्ये 70 पेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती पदावर राहू नये, अशी शिफारस लोढा समितीनं केली आहे. याच शिफारशीमुळे शरद पवारांनी एमसीए अध्यक्षपदावर न राहण्याचा निर्णय घेतला. "सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळं मला दु:ख झालं असून यापुढे काम करण्याची इच्छा नाही," असं पवार यांनी राजीनाम्यात म्हटलंय.

दरम्यान, पत्रकार परिषदेत नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा टीका केली. नोटबंदीनंतर देशात सुरू असलेल्या परिस्थितीला पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत. त्यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय चांगला आहे. मात्र, त्यांना पर्यायी व्यवस्था करता आलेली नाही, असा आरोप शरद पवार यांनी केलाय. देशाच्या अर्थव्यवस्थेवर, नागरिकांवर जे विपरीत परिणाम झाले, त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नाही, असंही ते म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या