युती झाल्यास वॉर्ड 105 मधून कोण?

मुलुंड - वॉर्ड क्रमांक 105 हा महिलांसाठी आरक्षित आहे. यामुळे या भागातून आता शिवसेना शाखाप्रमुख दीपक सावंत यांच्या पत्नी मेघना सावंत या निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. परंतु याच वॉर्डमधून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी देखील निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचीही चर्चा रंगत आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनावेळी सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यात दीपक सावंत यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. जर सेना-भाजपा युती झाली तर रावण दहनावेळी झालेल्या मारहाण नाट्ट्याचा वचपा काढण्यासाठी सोमय्या याच वॉर्डमधून उमेदवारीसाठी दावा करू शकतात अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या