भाजपा कार्यकारिणी बैठकीत पक्ष विस्ताराची सविस्तर चर्चा

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक सोमवारी सायन येथे पार पडली. ही बैठक सायन येथील मानव सेवा संघ येथे आयोजित करण्यात अाली होती. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यामध्ये मुंबईतील सर्व भाजपा आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, मुंबई पदाधिकारी, नगरसेवक पदाचे भावी उमेदवार, मंडल अधिकारी यांची उपस्थिती होती. संघटनात्मक बांधणी आणि चर्चा या बैठकीत झाली. राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश हे ही या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत राजकीय ठरावही मांडण्यात आले.

बैठकीतील मुद्दे पुढील प्रमाणे
-  देशात वस्‍तू व सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर तात्‍काळ मुंबईतील जकात कर हटविण्‍यात यावा.
- मुंबई महापालिकेचा नवीन विकास आराखड़ा मंजूर झाल्यानंतर महापालिका अधिनियम 1888  कलम (61) त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक
- पाण्‍याचे समान वाटप तसेच 24 तास पाणी पुरवठा करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपायोजनांना महापालिकेने वेग द्यावा
- महापालिकेचा ताळेबंद सुटसुटीत पद्धतीने तयार करून तो जनतेसाठी खुला करावा
- कॅशलेस व्‍यवहारांना प्रोत्‍साहन देण्‍यात यावे
- संपूर्ण मुंबईत मलनित्स:रन वाहिन्‍यांचे जाळे टाकण्‍याच्‍या कामाला वेग देण्यात यावा, तसेच ज्या भागात मलनित्सःरन वाहिन्या नाहीत त्या भागातील मल उत्सर्जन हे नद्या आणि नाल्यांमध्ये होत आहे ते थांबविण्यात यावे.
- मिठी, ओशिवरा, दहिसर, पोयसर आणि वालभाट या नद्यांचे पूनर्जीवन करण्यात यावे
- चांगले रस्‍ते हे मुंबईकरांना मिळायलाच हवेत
- मुंबईला पुरमुक्‍त करण्‍याच्‍या उपाय योजना करण्‍याच्‍या कामांना तात्‍काळ वेग द्यावा
- महापालिकेच्‍या वास्‍तू व सार्वजनिक ठिकाणी वापरण्‍यात येणाऱ्या विजेमध्‍ये बचत व्‍हावी म्‍हणून एलईडी दिव्‍यांचा वापर सक्‍तीने करण्‍यात यावा
- बेस्‍ट परिवहन सेवा सक्षम करण्‍याची आवश्‍यकता असून, प्रवाशांना चांगली सेवा मिळावीच शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्‍य सुविधांही मिळाव्‍यात त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात किमान 100 कोटींची तरतूद दरवर्षी करण्यात यावी

पुढील बातमी
इतर बातम्या