'आमच्या मागण्या मान्य करा'

मुंबई - मराठा क्रांती मोर्चा आयोजन समितीनं मुंबईत रविवारी जनजागृती बाइक रॅलीचं आयोजन केलं. यामध्ये मोठ्या संख्येनं मराठा तरुण-तरुणी सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता सोमय्या मैदानातून या बाइक रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस इथं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून या रॅलीचा समारोप झाला. या बाइक रॅलीमध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, तसंच शिवसेनेचे नेते आणि मनसे नेतेही सामिल झाले होते. मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी भाई जगताप यांनी केली, तर शेलार यांनी राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गंभीर असून कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये असं आवाहनही केेलं. या वेळी मराठा आरक्षणासह कोपर्डीतल्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या रॅलीतून करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या