पंकजा मुंडेंची बैठकीला दांडी

मुंबई - मंगळवारी झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दांडी मारलीय. सोमवारी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळालं. पण परळी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अपयश आले. ही लढाई पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी होती. मात्र यात धनंजय मुंडे यांची सरशी झाली. यामुळे पंकजा मुंडे यांनी मंगळवाराच्या मंत्री परिषदेच्या बैठकीत येण्याचं टाळल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान प्रकृती अस्वास्थामुळे बैठकीला हजर राहू शकले नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या