संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड शेकापमध्ये

सीएसटी - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि त्यांच्याशी संबंधित विविध संस्था संघटनांच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याची माहिती शेकाप नेते आणि आमदार भाई जयंत पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातल्या पत्रकार परिषदेत दिली.

शेकापच्या विधिमंडळ, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या कामगिरीनं प्रेरित होऊन हे सगळे अामच्याकडे आले, असं पाटील या वेळी म्हणाले.

25 वर्षं महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर कामं केली. सिंचनाच्या कमी प्रमाणामुळे शेतकरी कर्जात बुडालाय. स्वामिनाथन अायोगाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितलंय. या समस्या राजकीय व्यासपीठावरून सोडवता येतील आणि शेकाप या गोष्टींवर काम करत असल्यानं शेकापमध्ये प्रवेश केल्याचं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं. मराठा क्रांती मोर्चाशी संबध संपुष्टात अाल्याचंही ते म्हणाले. शिवाजी महाराजांचं प्रस्तावित स्मारक, मराठा समाजाला आरक्षण, नोटबंदी या विषयांवरही त्यांनी सरकारवर टीका केली.

पुढील बातमी
इतर बातम्या