सुर्यनमस्काराऐवजी पालिका शाळांचा दर्जा सुधारा

महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षनेते  प्रविण  छेडा  यांनी पालिका शाळांच्या खालावत चाललेल्या दर्जाचा लेखाजोखा मांडला. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना सुर्यनमस्कार नाही तर चांगले शिक्षण आणि सुखसोयी देण्याची गरज असल्याचं प्रविण छेडा यांनी म्हटलं. मराठी, हिंदी आणि गुजराती माध्यमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत चाल्याचंही त्यांनी म्हटलं. महापालिकेकडून एकूण 8 माध्यमांच्या 1 हजार 83 शाळांमधून 3 लाख 38 हजार 876 विद्यार्थी प्राथमिक तर 148 माध्यमिक शाळांमधून 37 हजार 915 विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेत आहेत. तर यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातोय. पण प्रत्यक्षात पालिका शाळांचा दर्जा मात्र दिवसेंदिवस घसरत चालल्याचा आरोप  छेडा  यांनी केला.

 

पुढील बातमी
इतर बातम्या