विधानसभा निवडणूक: प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात

महाराष्ट्रात (maharashtra) सध्या विधानसभा निवडणुकीचे (maharashtra vidhan sabha election 2024) वारे वाहत आहेत. सर्व पक्ष कंबर कसून प्रचार करत आहेत.

नुकतेच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला.

यात आता भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचा दौरा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा दिवसांत राज्यात 10 सभा आयोजित केल्या आहेत. मोदींची पहिली विधानसभा निवडणूक प्रचार सभा (election campaign) दुपारी 12 वाजता धुळ्यात होणार आहे.

दुसरी सभा नाशिकमध्ये दुपारी 2 वाजता होणार आहे. मोदी 9 नोव्हेंबरला तिसरी आणि चौथी सभा अकोला आणि नांदेड येथे होणार आहे.

12 नोव्हेंबरला पाचवी सभा चिमूर, सोलापूर येथे होणार असून पुण्यातील (pune) सभेसाठी रोड शोचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत (mumbai) येणार आहेत. मुंबईत त्यांची सभा शिवाजी पार्क येथे होणार आहे.

तसेच त्यांच्या उर्वरित सभा छत्रपती संभाजीनगर, रायगड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज (शुक्रवार) शिराळा (सांगली), कराड, सांगली आणि कोल्हापूर येथे चार सभा घेणार आहेत.


हेही वाचा

QR कोडद्वारे डॉक्टरांची ओळख पटवली जाईल

ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या