टोलमुक्तीबाबतचा अहवाल मॅनेज - वेलणकर

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमुक्तीसंबंधीचा अहवाल मँनेज असल्याचा धक्कादायक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलाय. सरकार आणि कंत्राटदारांच्या सोयीनुसार अहवाल तयार करण्यात आल्याचं म्हणताना वेलणकर यांनी टोलमुक्तीची मागणी सरकारकडे नव्यानं केलीये. महिन्याभरात टोलमुक्ती मिळाली नाही, तर न्यायालयात धाव घेणार असल्याचंही त्यांनी या वेळी म्हटलं.

टोलमुक्तीसाठी स्थापण्यात आलेल्या समितीनं टोलमुक्ती देणे शक्यच नसल्याचा अहवाल दिल्यामुळे टोलमुक्तीची आशा संपली आहे. पण अहवालात अनेक गोष्टींचा उल्लेखच नसल्यानं हा अहवाल 'मॅनेज' झालेला असून सरकार नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही वेलणकरांनी केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या