राज ठाकरे यांनी घेतली 'मुंबई लाइव्ह'कडून 'गरुड' भेट

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत वेबसाईटवर आता गरुड आरूढ झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. आकर्षक रंगसंगतीच्या पार्श्वभूमीवर दिसणारं गरुड पाहणाऱ्यांची नजर खिळवून ठेवतं. मनसेच्या अधिकृत वेबसाईटवर दिमाखात बसलेलं गरुड राज ठाकरेंना 'मुंबई लाइव्ह'कडून भेट म्हणून मिळालं आहे. 'मुंबई लाइव्ह' च्या 'उंगली उठाओ' या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीत राज ठाकरे यांना वाघ आणि सिंह यापैकी किंवा इतर कोणता प्राणी भावतो? या आशयाचा प्रश्न विचारण्यात आला होता. याला शिवसेनेच्या वाघाचा आणि भाजपाच्या सिंहाचा संदर्भ होता. अचानक सुचलेल्या या प्रश्नाला राज यांनी तितक्याच आत्मविश्वासाने उत्तर दिलं की, त्यांना गरुड बनायला आवडेल. आकाशात उंच झेपावणा-या गरुडाप्रमाणे जमिनीवर घडणा-या प्रत्येक गोष्ट, घटनेवर बारीक लक्ष ठेवण्याची इच्छा राज यांनी बोलून दाखवली आणि त्यादिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी गरुडपक्षी जवळचा झाला. पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनाची दिशा बदलून यशोदेवता प्रसन्न होते का हे चाचपडून पाहिल्यानंतर आता राज गरुड पक्षाकडून उत्तुंंग भरारीची प्रेरणा मनसे कार्यकर्त्यांनी घ्यावी, हा प्रयत्न करताना दिसत आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

'मुंबई लाइव्ह'च्या 'उंगली उठाओ' या विशेष कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले? हे पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.




पुढील बातमी
इतर बातम्या