नोटबंदीच्या समर्थनार्थ भाजपाची रॅली

बोरीवली - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटबंदीवर विरोधकांडून वारंवार टीका होत असल्यामुळे नोटबंदीला समर्थन देण्यासाठी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी रॅली काढण्यात आली. बोरीवली पश्चिमेच्या एस. व्ही. रोडवरील स्वामी विवेकानंद पुतळ्यापासून ते वीर सावरकर उद्यानापर्यंत ही रॅली काढली. या रॅलीत भाजपा आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक मोहन मिठगावकर आणि प्रवीण शाहही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या