राज ठाकरे युतीसाठी अनुकूल?

दादर - प्रस्ताव आला तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीबाबत विचार होऊ शकेल, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मनसेच्या इंजिनची भविष्यातली दिशा कोणती असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भांडुप पश्चिम येथील काँग्रेसच्या नारायण राणेसमर्थक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राज ठाकरे यांनी युतीबाबत हे वक्तव्य केलं.

राणेसमर्थक मनसेत

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भांडुप येथील नारायण राणेसमर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत, सुप्रिया धुरत, संतोष राणे, दिलीप हिरनाईक यांच्यासह भांडुप पश्चिम येथील सुमारे 200 कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.

पुढील बातमी
इतर बातम्या