राष्ट्रीय समाज पक्ष लागले निवडणुकीच्या तयारीला

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

जोगेश्वरी - सध्या सर्वच राजकीय पक्ष महानगरपालिका निवडणूक २०१७ च्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचीही निवडणुकीसाठी रेलचेल सुरू झाली असून गुरुवार संध्याकाळी ५ वाजता जोगेश्वरी पूर्व येथील दत्तगुरू सभागृहात उत्तर पश्चिम विभाग कार्यकर्त्यांची सभा पार पडली. सभेस राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकरही उपस्थित होते. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले. तसंच यंदाच्या निवडणुकीत कपबशी निशाणीसह राष्ट्रीय समाज पक्ष २२७ पैकी २२७ जागा लढवणार असल्याचं सभेत नमूद केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या