24 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील जुन्या नोटा

मुंबई - मुंबईकरांसाठी एक खुशखबर.. येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत वाढवण्यात आलीय. पुढील दहा दिवस या नोटा वापरण्यात येऊ शकतात. सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, मेट्रो स्टेशन, स्मशानभूमी, मेडिकल अशा महत्त्वाच्या ठिकाणी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच राज्यभरातील 24 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलवसुलीही केली जाणार नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या