परवाना नूतनीकरण न केलेल्या एनजीओंवर बडगा

मुंबई - मुदतीमध्ये परवाना नूतनीकरणाचा अर्ज सादर करण्यामध्ये हलगर्जी दाखवणाऱ्या राज्यातील एक हजारांहून अधिक सरकारी आणि बिगर सरकारी स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) परकीय देणगी नियम कायद्याखालील (एफसीआरए) नोंदणी रद्द करण्याचा बडगा केंद्रीय गृहमंत्रालयाने उगारलाय. त्यामध्ये एसएनडीटी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, कमला मेहता अंधशाळेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या नावानं सुरू असलेल्या संस्थेचाही समावेश आहे.

राष्ट्रीय पातळीवर आयआयटी, रामकृष्ण मिशन, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ या संस्थांवर कारवाई झाली आहे. वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक यांची संस्थाही या कारवाईच्या कक्षेत आली आहे. या कारवाईमुळे या संस्थांच्या परदेशी दात्यांच्या देणग्या पुढील पाच वर्षांसाठी रोखल्या गेल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या