मैदानावर शाळा बांधण्यास रहिवाशांचा विरोध

वाशी नाका - वाशी नाका परिसरात शाळेची गरज नाहिये. पण भाजपाचे स्थानिक नगरसेवक विठठल खरमोल यांनी खेळाच्या मैदानावर शाळा बांधण्याचा घाट घातलाय. सोमवारी त्यांनी भूमीपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र कार्यक्रमादरम्यान रहिवाशांनी विरोध केला. कार्यक्रमात त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

"या परिसरात हे एकमेव मैदान असल्यानं ते देखील हडपण्याचा डाव या नगरसेवकाचा आहे, या ठिकाणी शाळा होऊ देणारच नाही," असा अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी प्रमोद शिंदे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या