निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे नवे लोकायुक्त

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल बी.एस. कोश्यारी यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही.एम. कानडे यांची नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. न्यायमूर्ती कानडे यांची शपथ बुधवारी होणार आहे.

निवृत्त न्यायमूर्ती एम एल तहलियानी यांचा लोकायुक्त म्हणून ऑगस्ट 2020 मध्येच कार्यकाळ संपला होता. गेल्या वर्षभरापासून लोकायुक्तपद रिक्त होते. वर्षभर महाराष्ट्रात पूर्णवेळ लोकायुक्त नसल्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गेल्या आठवड्यात पत्र लिहून राज्य सरकारला नियुक्तीचे निर्देश देण्याची विनंती केली होती.

सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकायुक्त पद महत्वाचे आहे आणि 2015 ते 2020 दरम्यान सामान्य माणसासाठी एक चांगला पर्याय बनले आहे,  असं गलगली यांनी म्हटलं आहे. लोकायुक्त भ्रष्टाचारविरोधी प्रकरणासाठी महत्वाचे पद आहे. नागरिक कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधीविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी थेट लोकायुक्तांकडे करू शकतात, ज्यांच्याकडे जलद निवारणाचे काम आहे. त्यामुळे राज्यपालांनी राज्य सरकारला तातडीने लोकायुक्त नियुक्त करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी गलगली यांनी केली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या