आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवून द्या, मुख्यमंत्र्यांची मागणी

आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच  ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंतीही केली. फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती देखील वाढवावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या