सेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपच्या मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे हे नेते सहभागी झाले.

तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजप आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर भाजपनेही मुरजी पटेलांचे दोन अर्ज दाखल केलत.राजकीय शह काटशहानंतर ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.

मूळ शिवसेना ही आमच्या बाजूने असून मुरजी पटेल हे बहुमताने विजयी होतील असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे.

दरम्यान, अंधेरी निवडणूक कार्यालय बाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. निवडणूक कार्यालयाच्या आजूबाजूचा 100 मीटर अंतरावर असलेला परिसर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून संपूर्ण परिसर सील केला आहे.


हेही वाचा

शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांना धमकी, मुलीला...

बनावट प्रतिज्ञापत्रांची सीआयडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करावी : नरेश म्हस्के

पुढील बातमी
इतर बातम्या