महिलांनाही त्यांची बाजू मांडण्यासाठी हक्काची जागा मिळावी - रामदास आठवले

आज जिथं तिथं आरक्षणाच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे. अशा परिस्थितीत महिलांनाही त्यांची बाजू मंडण्यासाठी हक्काची जागा मिळायला हवी, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. याचसोबत संसदेत महिलांना एकतृतीयांश आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. 

रिपाइं महिला आघाडीच्यावतीने महिला मेळाव्याचं प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची संयुक्तरीत्या जयंती करण्यात आली. यावेळी महिलांना समाजात समान हक्क मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

महिलांशिवाय राजकारणाला दिशा नाही

महिला राजकारणात उतरल्याशिवाय राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांना योग्य ती दिशा मिळणार नाही. महिलांनी मोठ्या संख्येने राजकारणात येणे गरजेचं आहे. समाजात अनेक तरुण महिला या विधवा आहेत, त्यांच्या प्रश्नांवरही काम करण्याची सध्या समाजात अत्यंत आवश्यकता असल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. 

पुढील बातमी
इतर बातम्या