भाजपा-शिवसेना युतीमुळे उमेदवारांमध्ये नाराजी

मुंबई - राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांसाठी झालेल्या शिवसेना-भाजपा युतीचे पडसाद मुंबईत उमटू लागले आहेत. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या इच्छुक उमेदवारांमधून नाराजीचे सूर उमटू लागलेत. मुंबईत दोन वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध सुरू आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक आमदार असल्यानं फेब्रुवारीमध्ये होणारी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. शिवसेना-भाजपामधील वादामुळे मुंबईत युतीची शक्यता कमी आहे, असं समजून अनेकांनी भाजपामध्ये इनकमिंग सुरू केलं होतं. मात्र आता युतीचे वारे पुन्हा वाहू लागल्यानं भाजपामध्ये येणाऱ्या इच्छुकांनी धसका घेतला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या