अरुण गवळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार?

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी सध्या जामीनावर बाहेर आहे. बाहेर येताच अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अरूण गवळी उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण अरूण गवळी यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

अरूण गवळीचा अखिल भारतीय सेना हा पक्ष आहे. सध्या पक्षाचं काम सक्रीय पणे होत नाही. पण गवळी बाहेर आल्यामुळे या पक्षाला उभारी मिळेल अशी चर्चा आहे. काही काळ हा पक्षा त्याच्या मुलीने सांभाळला होता. त्या पक्षाच्या नगरसेवकही झाल्या होत्या. आता गवळी बाहेर आल्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक अखिल भारतीय सेना लढवणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

अरूण गवळी हा स्वत:आमदार राहीला आहे. त्याने लोकसभेची निवडणूक ही लढवली होती. त्यात त्याला चांगली मतं ही मिळाली होती. त्यांना मानणारा वर्ग भायखळ्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक डॅडी लढणार का असं विचारण्याच आलं.

त्यावर बोलताना अरूण गवळी म्हणाला, मला सर्व जण आपला मानतात. लोक प्रेम करतात. पण आता लिडर शिप करण्याची आपली इच्छा नाही. मला राजकारणात कोणताही इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी आणि माझा पक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे. 

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अरूण गवळी मैदानात असणार नाही. पण पडद्या मागून ते कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष नक्कीच असणार आहे.


हेही वाचा

मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आता पारदर्शक काचेने बंदिस्त करणार

पुढील बातमी
इतर बातम्या