शिवसेना-भाजपा दोघे भ्रष्टाचारी - सावंत

नरिमन पॉइंट - मुंबईत शिवसेनेने एकही काम न केल्याने हार्दिक पटेल यांना आणावे लागत असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन सावंत यांनी केला आहे. हार्दिक पटेल सध्या मुंबईत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत त्याने संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ही टीका केली. राज्यात सत्तेसाठी काम करायचे आणि महापालिकेत ओरडत बसायचे ही शिवसेना भाजपची रणनीती असून शिवसेना-भाजपा दोन्ही भ्रष्टाचारी असल्याची टीकाही सावंत यांनी केली. नरिमन पॉइंट इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

साखरेवर दिली जाणारी केंद्राची सबसिडी बंद होणार असल्याने शासन दरात साखर मिळणे कठीण होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय अर्थ संकल्पातील दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय वर्गासाठी आघाडी सरकारच्या काळात साडेचार हजार कोटींची तरतूद होती. या सरकारने ती कमी करत दोनशे कोटी करून अन्याय केला असल्याचंही सावंत म्हणाले. राज्यसरकारने गोरगरिबांची साखर पळवली आहे. मुख्यमंत्री मौन का बाळगत आहेत असा सवालही सावंत यांनी या वेळी उपस्थित केला.

पुढील बातमी
इतर बातम्या