'ऐ दिल है मुश्किल'वरून राडा

बोरिवली - येथील मेक्सेस सिनेमा चित्रपटगृहात संभाजी ब्रिगेडकडून ऐ दिल है मुश्किल या सिनेमाविरोधात आंदोलन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या वेळी ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचं पोस्टर काढून पेटवण्यात आलं. तसंच पकिस्तानी कलाकारांना यापुढे कोणत्याही चित्रपटात घेऊ नये, अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या