देशपांडे, धुरी यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई – खड्डे आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नॉट रिचेबल असलेले मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी शनिवारी संध्याकाळी पोलिसांसमोर हजर झाले. शिवाजी पार्क पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, त्यांना वरळी रात्र न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खड्डे न बुजवल्य़ा प्रकरणी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी मुख्य अभियंत्याला रस्त्यावर उभे केले होते. त्यावरून गेल्या तीन दिवसांपासून मनसे आणि अभियंत्यांमध्ये 'खड्डेकारण' सुरू होते. अभियंत्यांकडून या दोघांच्या अटकेची मागणी होत होती. अखेर देळपांडे आणि धुरी यांनी शनिवारी पोलिसांना शरण येत अटक करून घेतली. "कोणत्याही आंदोलनाला घाबरून आपण शरण आलेलो नाही", असे सांगतानाच देशपांडे यांनी जामीन घेणार नसल्याचा पुनरूच्चार केला आहे.

दरम्यान, देशपांडे-धुरी यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या परिसरात मनसे समर्थकांनी मोठ्या संख्येने जमा होत पालिका प्रशासन आणि अभियंत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या