मिसेस देशपांडेही निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई - मनसेचे नगरसेवक आणि राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक 191मधून लढवणार आहेत. स्वतः देशपांडे प्रभाग क्रमांक 185चे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्या या प्रभागाचा आता विस्तार झाला असून 191 हा नवीन प्रभाग अस्तित्वात आला आहे. हा प्रभाग महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या भागातलं वर्चस्व कायम राखण्यासाठी संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्नीला येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. निवडणूक लढवण्यासाठी स्वप्ना देशपांडे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामाही दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या