निरुपम यांचे भाजपवर आरोप

सीएसटी - मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपवर निशाणा साधलाय. "राज्यात आणि देशात युतीचं सरकार असूनही कोस्टल रोड, इंदू मिल, बुलेट ट्रेनच्या कामाला अजून सुरुवातही झालेली नाहीये. फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्यात." तसंच "नागपूर इथली बाबा रामदेव यांना देण्यात आलेली 230 एकर जमीन आणि अनिल अंबानींना देण्यात आलेली 111 जमीन सरकारनं तोटा पत्करून दिलीय. या दोन्ही जमिनींचे व्यवहार संशयास्पद आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली," असा आरोपही त्यांनी केला.

"चॅरेटीच्या नावाखाली एका ब्रिटिश ऑर्केस्ट्रा कंपनीला शो करण्यासाठी एमएमआरडीएचं मैदान अल्प दरानं देण्यात आलंय. त्यामुळे सरकारला महसुलावर पाणी सोडावं लागणार आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार आहोत. या व्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा," अशी मागणीही निरुपम यांनी या वेळी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या