पुन्हा निवडणुका...पुन्हा वचननामा

दादार - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत सोमवारी शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वचननामा घोषित केला. जे बोलतो ते करुन दाखवतो अशा नवीन टॅगलाईनने वचननामा घोषित करण्यात आला.

2012 सालच्या शिवसेना-भाजपा युतीच्या वेळी दोन्ही पक्षांनी एकच वचननामा घोषित केला होता. मात्र यंदा युतीच्या निर्णयाच्या अगोदरच शिवसेनेने आपला वचननामा घोषित केला. युती झाली तर भाजपाच्या चांगल्या सूचनांचा वचननाम्यात समावेश केला जाईल. तसेच युतीबाबत मुख्यमंत्र्यांकडून फोन येईल तेव्हा बोलू असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबईकरांसाठी शिवसेनेचा वचननामा -

  • मुंबईकरांसाठी 500 स्क्वे. फुटाची घरं मालमत्ता करमुक्त

  • 700 स्क्वे. फुटाच्या घरांना मालमत्ता करामध्ये सवलत

  • तरुणांसाठी ई-वाचनालय

  • कौशल्य विकास आणि व्यवसायाभिमुख शिक्षणास प्राधान्य

  • महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य

  • देशाच्या स्वातत्र्यांची गाथा सांगणारे स्मृती दालन

  • मुंबईसाठी मोठे पर्यटन क्षेत्र

  • नवीन उद्याने, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे

  • मैदानी खेळांसाठी अधिक मैदाने

  • मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना

  • गोवंडीमध्ये शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार

  • जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा आपल्या दारी

  • महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जेनेरिक मेडिसिनची दुकानं

  • स्वच्छतागृहात महिलांकरिता सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीनची सोय

  • देवनार डम्पिंग ग्राऊंड येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार

  • रात्रीसुध्दा कचरा उचलण्याची सोय सर्वत्र सुरु करणार

  • सांडपाणी पुनर्वापर करण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्र

  • मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी प्राधान्य

  • आरे कॉलनीतील हरित पट्ट्याचे आरक्षण कायम ठेवणार

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उर्वरीत रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करुन खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार

  • मुंबई महापालिकेचा आणि बेस्टचा अर्थसंकल्प एकत्र करुन मांडणार

  • मुंबईच्या रस्त्यावर बेस्टच्या मिनी बसेस

  • बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच

  • गणवेशातील विद्यार्थ्यांना बेस्टचा मोफत प्रवास

  • पशु आरोग्य सेवा सुरु करणार

  • मुंबईतील डब्बेवाल्यांसाठी डब्बेवाला भवन बनवणार

  • मराठी नाट्यभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन

  • गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिका सेवा सुविधा देणार

  • सफाई कामगारांसाठी घरकुल योजना आणि सफाई कामांसाठी अत्याधुनिक साहित्य

  • फुटबॉलसाठी मैदाने आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र बनविणार

  • गोवंडीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल

  • गावठाण आणि कोळीवाड्यातील बांधकामे अधिकृत करणार

पुढील बातमी
इतर बातम्या