शिवडी - आचार्य दोंदे मार्गावरील बारादेवी मनपा शाळेत प्रभाग 202 मधील उमेदवारांनी मतदान केले. मात्र, सदरील मनपा शाळा ही टेकडीवर असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांच्या सेवेसाठी महापालिकेचे चार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. परंतु ती व्यवस्था पुरेशी ठरली नाही. एफ दक्षिण विभागाचे हे कर्मचारी ज्येष्ठ, रुग्ण आणि अपंग अशा नागरिकांना एका खुर्चीवर बसून जिना चढून वर घेऊन जात होते. मात्र शाळा किंवा मतदान केंद्र तळमजल्यावर असते तर खूप बरे झाले असते अशा शब्दांत काही ज्येष्ठ मतदारांनी नाराजी व्यक्त केली.