राजीनामा देण्याचा शरद पवारांचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या समितीने फेटाळला

राजीनामा देण्याचा शरद पवार यांचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या सदस्य समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर इथे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेणाऱ्या समितीच्या बैठकी पार पडली. या शरद पवार यांचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव फेटाळला.

शरद पवार यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान शरद पवार या बैठकीला उपस्थित नाहीत. त्यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर समितीला पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या