परिचारक प्रकरणावरून शिवसेनेचा सभात्याग

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवारही गोंधळाने झाली. यावेळी कामकाज सुरू होताच विरोधक आणि शिवसेनेने प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरत सभात्याग केला.

'परिचारक हाय हाय'च्या घोषणा

प्रशांत परिचारक यांच्या रद्द केलेल्या निलंबनाच्या विरोधात शिवसेना आणि विरोधक एकत्र वेलमध्ये उतरले. यावर सरकार संध्याकाळी सभा संपण्याच्या आधी आपले निवेदन देईल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाला दिली. मात्र विरोधक आणि सेनेनं आपला विरोध कायम ठेवून 'परिचारक हाय हाय'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुरुवातीला विधानसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केली.

'कारवाई व्हायला हवी'

मात्र त्यानंतरही शिवसेनेचा परीचारकांविरुद्धचा आक्रमक पवित्रा कायम होता. प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा या मुद्दयावर शेवटी शिवसेना आमदारांनी सभात्याग केला. यामध्ये शेवटी मुख्यमंत्र्यानी हस्तक्षेप करत यावर कारवाई व्हायला हवीच ही आमची भूमिका आहे. मात्र हा विषय विधान परिषदेचा विषय असून तिथले सदस्य जो निर्णय घेतील ते विधानसभेला अवगत केलं जाईल, अशी भूमिका विधानसभेसमोर मांडली.

पुढील बातमी
इतर बातम्या