बांद्रेकरवाडीत साई भंडाऱ्याचं आयोजन

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

जोगेश्वरी - साई अमर मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साई भंडारा आणि सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली 19 वर्षे जोगेश्वरी ते शिर्डी पदयात्रा काढली जाते. त्या निमित्त भक्तांसाठी भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं. जवळपास 7000 भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. वॉर्ड क्रमांक 66चे शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि संभाव्य उमेद्वार अमर गोपाळ मालवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी होतो. सोहळ्याला साई अमर मित्र मंडळाचे अध्यक्ष नामदेव राठोड, मंडळाचे सचिव चंद्रकांत लाड, खजिनदार रूपाली पाताडे, पालखी प्रमुख मिलिंद पै, महिला प्रमुख वंदना रेडिज यांचा देखिल सहभाग होता.

पुढील बातमी
इतर बातम्या