शिवसेना गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवले, त्यांच्या जागी 'या' नेत्याची वर्णी

शिवसेनेविरोधात बंड करुन सुरतमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर सेनेने कारवाई करत त्यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. त्या ठिकाणी आता शिवडी मतदारसंघाच्या अजय चौधरी यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत हा निर्णय घेतला आहे. 

अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता.

चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही."


हेही वाचा

नॉटरिचेबल असलेल्या एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले शिवसेना... एकनाथ शिंदे नेमके नाराज का? 'ही' आहेत कारण

पुढील बातमी
इतर बातम्या