बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवणार असल्याची घोषणा बुधवारी शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. बाळासाबांच्या जीवनावर आधारित बायोपिक हिंदी आणि मराठी या दोन भाषेत बनवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

हा एक ड्रिम प्रोजेक्ट

हा एक ड्रिम प्रोजेक्ट असून ही डॉक्युमेंट्री नसून महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या जीवनावर आधारित बनवण्यात आलेल्या सिनेमाप्रमाणेच हा बायोपिक असेल, अशी माहिती राऊत यांनी दिली. पण या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तीरेखा कोण साकारणार याबद्दलची माहिती २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या कार्यक्रमातच दिली जाईल, अशी माहिती संजय राऊत यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.

काधी प्रदर्शित होणार सिनेमा?

या बायोपिकसाठीचं लिखाण संजय राऊत करत आहेत. या सिनेमाचं शूटिंग जानेवारीपासून सुरू होईल. तर हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित होईल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या