मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी विविध कार्यक्रमांसाठी शुक्रवारी मुंबईमध्ये आले. प्रणब मुखर्जी दुपारी राज भवनावर काही वेळासाठी थांबले असता उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली.
राष्ट्रपतीपदासाठी प्रणब मुखर्जी उभे असताना शिवसेनेचे समर्थन मिळवण्यासाठी प्रणब मुखर्जी यांनी मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी एनडीएचे घटक असलेले शिवसेना आणि जनता दल युनायटेड या पक्षांनी प्रणब मुखर्जींना समर्थन दिले होते. त्यावेळी भाजपाकडूनही काही मते प्रणब मुखर्जी यांना मिळाली होती.