ओवेसींच्या सभेत भिरकावला बूट

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नागपाडा येथे मंगळवारी झालेल्या सभेत अनोळखी व्यक्तीने स्टेजच्या दिशेने बूट भिरकावून पळ काढल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

बैठकीत भिरकावला बूट

खासदार ओवैसी यांनी 'मुस्लिम वुमन बिल २०१७' याला विरोध केला होता. याबाबत नागपाडाचे आमदार वारिस पठाण यांनी सेव्ह शिरियत या बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी मंगळवारी या बैठकीत उपस्थित होते. ओवैसी हे उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना. स्टेजपासून काही अंतरावर बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बूट स्टेजच्या दिशेने भिरकावत तेथून पळ काढला. तो बूट स्टेजजवळील नागरिकांच्या अंगावर पडला

आरोपीचा शोध सुरू

त्यात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याबाबत पोलीस तपास करत असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून स्थानिक परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सहआयुक्त देवेन भारती यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या