'मी भाषणामध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही. जगात दमानिया नावाचे अनेक व्यक्ती असतात. मला कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही. शेतात कष्ट करणारा मी एक शेतकरी आहे. ज्यांची जमीन सरकारजमा झाली आहे, ते सूड भावनेने आरोप करत आहेत. नाथाभाऊंचा 'भुजबळ' करायचा असे कुणाला वाटत असेल, तर तो मनोरंजनाचा विषय आहे, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे बोलत होते.
आपल्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या संदर्भात दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. तसेच खडसे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ध्वनीचित्रफीत दमानिया यांनी ट्विटरवर टाकली आहे.
खडसे यांनी एका कार्यक्रमादरम्यान माझ्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, माझ्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे मला समजले. त्याचवेळी मी खडसे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार होते. मात्र हे सिद्ध करणारे पुरावे माझ्याकडे त्यावेळी नव्हते.
बघा काय म्हणाले होते खडसे?
आता मला माझे म्हणणे सिद्ध करणारी ध्वनीचित्रफीत मिळाली आहे. खडसे यांनी माझ्याविरोधात अशी भाषा वापरण्याची ही तिसरी वेळ आहे. यामुळे मी अतिशय नाराज आहे. या बद्दल त्यांच्यावर ३५४ कलमाअंतर्गत कारवाई करुन त्यांनी तत्काळ अटक करण्यात यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
मी भाषणात कुणाचेही नाव घेतलेले नाही. मला कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही. तसे केले नाही. माझी कोणतीही कंपनी वा शिक्षण संस्था नाही. कोणाला वाटत असेल की नाथाभाऊंचा छगन भुजबळ करावा, तर तो त्या व्यक्तीच्या मनातील मनोरंजनाचा विषय आहे.
- आ. एकनाथ खडसे
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)